पंतप्रधान स्वनिधी योजना 2024 |PM swanidhi yojana रु.५०,००० पर्यंत कर्ज .

स्वनिधी योजना परिचय !

swanidhi yojana 2024 : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सरकार दरवर्षी देशातील सर्वसामान्य नागरिक हितासाठी तसेच नवीन रोजगार निर्मितीसाठी त्याचप्रकारे नवीन व्यावसायिकासाठी विविध योजनांचा उपहार देत असते अगदी त्याचप्रकारे पंतप्रधान swanidhi yojana 2024 ( स्वनिधी योजना ) , मुख्य तत्वावर सामन्य नवोदित सर्वसाधारण व्यापारी तसेच फेरीवाले या नागरिकाच्या व्यवसायिक आणि आर्थिक प्रगतीसाठी सदर योजना राबवण्यात येत आहे , सदर योजनेबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे कृपया पूर्ण वाचा .

सदर , योजनेचा मुख्य उद्देश !

देशाचे , पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वनिधी योजेनेची संकल्पना , केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीमध्ये दिनांक 1 जून रोजी मांडली आणि तात्काळ सदर योजेनेस मंजुरी मिळून अंबलबजावणी चा निर्णय झाला . स्वनिधी योजनेअंतर्गत लहान व्यवसायिक वर्ग अर्थात रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वतःचा व्यवसाय नव्याने सुरु करण्यसाठी तसेच व्यवसाय वृद्धी आणि नागरिकाची किंवा सदर व्यवसायीकाची आर्थिक प्रगतीस चालना मिळण्यासाठी सदर योजना राबण्यात येत आहे आणि हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे , swanidhi yojana 2024 मध्ये लहान व्यवसाय सुरु करण्यसाठी किमान रु.५०,००० इतकी रक्कम प्रत्येकी अशी तरतूद राबवण्यात येत आहे यास , स्ट्रीट व्हेंडर्स सेल्फ-रिलेंट फंड म्हणून अधोरेखित केले आहे , या योजनेची पात्रता , अर्ज , रक्कम तपशील , व्यवसाय पात्रता इत्यादी तपशील आपणास खालीलप्रमाणे मिळेल .

  • योजनेचे नाव : PM स्वनिधी योजना २०२४
  • योजना : केंद्र सरकारी
  • योजना लाभ पात्रता : कमी किंवा मध्यम व्यापारी
  • कर्ज रक्कम : रु.५०,०००/- पर्यंत
  • अर्ज प्रक्रिया : ONLINE

कोणत्या बँक द्वारे कर्ज मिळू शकते ?

अनुसूचित व्यावसायिक बँक नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या
प्रादेशिक ग्रामीण बँकामायक्रोफायनान्स संस्था
स्मॉल फायनान्स बँकबचत गट बँका
सहकारी बँकमहिला निधी इ

स्वनिधी योजना लाभ आणि इतर बाबी !

योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी देखील आहेत. अनेक लाभार्थी कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात असमर्थ असतात. तसेच, काही ठिकाणी जागरूकतेचा अभाव असतो, ज्यामुळे लाभार्थींना या योजनेचा फायदा घेता येत नाही.

१. पात्रता निकष

  • रस्त्याच्या कडेल्या दुकानधारक, फेरीवाले, हातगाडीवाले, तसेच लघु व्यवसाय संचालक.
  • व्यवसायाची स्थापना: व्यवसायाची स्थापना २४ मार्च २०२० च्या पूर्वी झाली असावी.
  • आधार क्रमांक: लाभार्थीला आधार क्रमांक असावा, जो अनिवार्य आहे.
  • भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे
  • तुमच्या व्यवसायात किमान ६ महिने गुंतलेले असणे आवश्यक आहे.
  • वार्षिक उत्पन्न ₹1.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.

स्वानिधी योजनेचे पात्र लाभार्थी कोण आहेत ?

नाईची दुकाने मोची
सुपारीची दुकाने (पानवडी) लॉन्ड्री दुकाने (धोबी)
भाजी विक्रेते फळ विक्रेते
रेडी टू इट स्ट्रीट फूड चहा विक्रेते
ब्रेड, पकोडे आणि अंडी विकणारे कपडे विकणारे फेरीवाले
पुस्तके/स्टेशनरी विक्रेते कारागीर उत्पादने

स्वनिधि योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे !

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक खाते
  • उत्पन्नाचा पुरावा
  • रहिवासी प्रमाणपत्र इ.

स्वनिधी योजना , अर्ज तसेच तपशील !

अ. ऑनलाइन अर्ज

  • PM SWANIDHI पोर्टलवर जा: PM SWANIDHI पोर्टल वर लॉग इन करा.
  • अर्ज फॉर्म भरा: “अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करून आवश्यक माहिती भरा.
  • कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • सबमिट करा: सर्व माहिती एकदा तपासल्यानंतर अर्ज सबमिट करा

ब . कर्ज मंजुरी प्रक्रिया

  • अर्ज सादर केल्यानंतर, संबंधित बँक किंवा वित्तीय संस्था कागदपत्रांची सत्यता तपासते.
  • जर सर्व कागदपत्रे योग्य असतील तर कर्ज मंजूर केले जाते.
  • मंजूर झाल्यावर, कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा केली जाते.

क . परतफेड प्रक्रिया

  • कर्ज घेतल्यानंतर, एक वर्षाच्या आत परतफेड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज प्रक्रियेसाठी सर्व कागदपत्रे व्यवस्थित आणि पूर्ण ठेवणे महत्त्वाचे आहे.
  • बँक किंवा वित्तीय संस्थेशी संपर्क साधून आपल्या अर्जाची स्थिती जाणून घ्या.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही एक सुवर्णसंधी आहे, जी छोट्या व्यवसायिकांना आर्थिक स्थिरता प्रदान करते. योग्य माहिती आणि कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया पार केली तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. आपल्या आर्थिक भवितव्याची उभारणी करण्यासाठी ही योजना एक महत्त्वाचा पाऊल आहे! त्याचप्रमाणे अश्याच काही योजनेचा तपशील येथे क्लिक करून आपणास पाहण्यास मिळेल . आणि अश्याच राज्य व केंद्र सरकारी योजनाची माहिती आपणास लवकरात – लवकर मिळण्यासाठी Rojgarsathi.com ला आताच भेट द्या .