मुलगी UPSC उत्तीर्ण, आनंद गगनात मावेना, पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू! यवतमाळची दुख:द घटना.

नुकताच यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला यात महाराष्ट्रात 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळवला आहे यामध्येच मोहिनी खंदारे ही आयएसएल व तिच्या आयुष्याचा आनंद साजरा करताना वडिलांच्या दुर्दैवी घटना झाली.आनंदोत्सव सुरु असताना वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा निधन झाल.  प्रल्हाद खंदारे अस मोहिनी खंदारे यांच्या वडिलांचे नाव आहे ते पुसदच्या पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधिकारी होते

UPSC

 प्रल्हाद खंदारे यांची कन्या मोहिनी हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश संपादन करून आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली. या ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण खंदारे कुटुंबांनी गावात मोठा कार्यक्रम आयोजित केला होता.

मात्र कार्यक्रमात दरम्यानच प्रल्हाद खंदारे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी महागाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले त्यामुळे खंदारे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

 मोहिनी खंदारे या सध्या पंचायत समिती बुलढाणा येथे गटशिक्षणाधिकारी आहेत आता त्या केंद्रीय प्रशासकीय सेवेत रुजू होते मात्र त्या अडीच वडिलांचे निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

 मोहिनी प्रल्हाद खंदारे यांनी सुरुवातीला पुण्याच्या कोचिंग क्लास मध्ये स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास केला त्यानंतर त्यांनी स्वयं अध्ययन करत यशाला गवसणी ग़लत एमपीएससीत उत्तीर्ण होऊन उपशिक्षण अधिकारी झाले होते नंतर 2023 मध्ये बुलढाणा पंचायत समितीमध्ये गटशिक्षण अधिकारी पदी नियुक्त झाल्या होत्या.