shetkari vima 2024 : केंद्र तसेच राज्य सरकार दरवर्षी गरीब सामन्य नागरिकासाठी नवीन योजना राबण्यासाठी तत्पर असते , आणि त्या योजना नुसत्या कागदपुरत्या नसून त्यांची प्रत्यक्षात अंत्यंत चांगल्या प्रकारे अंबलबजावणी देखील करण्यात येते जेणेकारण अशिक्षित किंवा साक्षर नागरिक त्या shetkari vima 2024 योजनेचा लाभ चांगल्या प्रकारे घेतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार मार्फत शेतकरयासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अमलात आणली असून ही शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि गरजेची योजना आहे. भारतीय कृषी क्षेत्रातील संकटे आणि आव्हानांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ही योजना राबवली गेली आहे. शेतकरी आपल्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करतात, आणि त्यात अपघात हे एक महत्त्वाचे कारण आहे. अपघात झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने तयार केलेली ही योजना, शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्याच्या उद्देशाने आहे.
गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी होते, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अनेक लढा दिला , यामुळेच या योजनेस हे नाव अगदी शोभून दिसते आणि मुख्य उद्देश म्हणजेच कि, शेतकऱ्यांना अपघाताच्या प्रसंगी तातडीने आर्थिक मदत करणे आहे. अपघात झाल्यास शेतकऱ्यांना मिळणारा विमा संरक्षण कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास मदत करतो . मुख्य हेतू सोबतच आपण या योजनेची पात्रता तपशील ,अर्ज प्रक्रिया , लागणारी कागदपत्रे इत्यादी घटक खालील प्रमाणे पाहणार आहोत .
सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांचे कुंटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून
नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई-वडिल, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी, यापैकी
कोणतीही एक व्यक्ती) असे 90 ते ७५ वयोगटातील एकूण २ जणांना गोपीनाथ मुंडे शोतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह
अनुदान योजना राबविण्यास संदर्भाधिन शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी लाभ प्रदान करण्यासाठी कुटुंबाच्या
व्याख्येमध्ये दोतकऱ्याचे (आई-वडिल, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी, यापैकी कोणतीही एक
व्यक्ती) यांचा समावेश ग्राह्य धरण्यात यावा.
अधिकृत GR क्लिक करा
योजनेंतर्गत देय लाभ :- सदर योजनेअंतर्गत अपघात ग्रस्त शोतकऱ्यांना /त्यांच्या कुटुंबियांस प्रकरणपरत्वे
खालील प्रमाणे लाभ अनुज्ञेय राहील.
अ.क्र | अपघाताची बाब | नुकसान भरपाई |
1 | अपघाती मृत्यू | रु.२,००,०००/- |
2 | अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक पाय किंवा एक हात निकामी झाल्यास | रु.२,००,०००/- |
3 | अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास | रु.१,००,०००/- |
१) नैसर्गिक मृत्यू, २ विमा कालावधी पुर्वीचे अपंगत्व ३) आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा
जाणीवपुर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे, ४) गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात ५)
अमंली पदार्थाच्या अमंलाखाली असताना झालेला अपघात, ६) भ्रमिष्ठपणा ७ शरिराअंतर्गत रक्तस्राव ८) मोटार
शर्यतीतील अपघात ९) युध्द, १०) सैन्यातील नोकरी, ११) जवळच्या लाभधारकांकडून खुन.
गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजना ही शेतकऱ्यांना एक नवा आशावाद देते. shetkari vima 2024 या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मान मिळतो आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षा सुनिश्चित केली जाते. सरकारच्या या उपक्रमामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक स्थिरता साधता येईल आणि शेतीच्या क्षेत्रात नवीन आत्मविश्वास निर्माण होईल.
योजना आणि सुविधांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी Rojgarsarthi.com या वेबसाइटला भेट देणे अत्यंत आवश्यक आहे. येथे त्यांना योजनांच्या अटी, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि इतर आवश्यक माहिती उपलब्ध होईल. तसेच आरोग्य सुरक्षेसाठी योजना संबधित योजेसाठी येथे क्लिक करून त्या योजनेची माहिती घेऊ शकता .
GIPE Pune Bharti 2025 : गोकले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे (GIPE Pune) ही…
NHM AhilyaNagar Bharti 2025 The National Health Mission (NHM), AhilyaNagar has opened its heart once…
SSC CGL Recruitment 2025 SSC म्हणजे कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission). CGL म्हणजे "Combined…
LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…
लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…
महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…