Daily Update

स्वाधार योजना 2024 |swadhar yojana संबधित सविस्तर .

स्वाधार योजना , थोडक्यात परिचय !

swadhar yojana 2024 : केंद्र आणि राज्य सरकार देशातील विधार्थी वर्गास उच्च शिक्षण प्राप्त होण्यसाठी वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत असते . महाराष्ट्र सरकार मार्फत दरवर्षी राबवली जाणारी विध्यार्थी स्वाधार योजना याच कारणे आहे , सदरील swadhar yojana 2024 दरवर्षी राज्य सरकार मार्फत राबवली जात असते त्याचप्रमाणे या वर्षी देखील सदरील योजना राबवण्यात येत आहेत . सदरील योजना मागासवर्गीय विध्यार्थी गटासाठी असून सादर योजना शिष्यवृत्ती रक्कम चांगल्या प्रमाणत मिळते , जेणेकारण सदर योजनेस प्रत्येक होतकरू विध्यार्थ्याने अर्ज करावा हि आशा बाळगून सदरील योजनेबाबत सविस्तर माहिती उदिष्टे , पात्रता , अर्ज प्रक्रिया , मिळणारी रक्कम इत्यादी महत्त्वपूर्ण माहिती आपणास खालीलप्रमाणे मिळेल .

स्वाधार योजना 2024 उदिष्टे !

महाराष्ट्र राज्य स्वाधार योजनेची संकल्पना 2018 साली मांडण्यात आली होती , सदर योजनेची मुख्य उदिष्ट लक्षात घेऊन तात्काळ सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात आली , ती मुख्य कारणे अशी कि राज्यातील मागासवर्गीय म्हणजेच अनुसूचित जाती (SC) , अनुसूचित जमाती (ST) , तसेच नवबौद्ध प्रवर्ग (NP) मधील विद्यार्थी ज्यांचे पालक किंवा पूर्ण परिवार उत्त्पन फारच कमी आहे जेणेकारण अश्या मुलांना पदवी , पदविका इत्यादी उच्च शिक्षणाचा लाभ घेता येत नाही तसेच उच्च शिक्षणासाठी जिल्हा ठिकाणी जाऊन राहणे वसतिगृह प्रवेश न मिळाल्याने भाड्याने निवास करणे इतर समस्या ज्यामध्ये अश्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागते किंवा शिक्षण सोडावे लागते हि बाब लक्षात घेता राज्य सरकार मार्फत महाराष्ट्र राज्य स्वाधार योजनेची स्थापना करण्यात आली यामध्ये विध्यार्थ्यास वार्षिक ५१, ०००/- रुपये शिष्यवृत्ती मिळणार असून यामध्ये निवास , बोर्डिंग , अभ्यासिका इत्यादी खर्च तो भागवू शकेल चला तर सदर योजनेची पात्रता ,अर्ज प्रक्रिया , काही अटी व शर्ती पाहू …..

योजनेचे नाव महाराष्ट्र स्वाधार योजना 2024
योजना सुरु वर्ष 2018 पासून
मिळणारी शिष्यवृत्ती 51000/- रुपये वार्षिक
लाभार्थी प्रवर्ग अनुसूचित जाती , जमाती ( SC ,ST ,NP) नव बुद्ध प्रवर्गातील विद्यार्थी
शैक्षणिक पात्रता 10 & 12 पदवी , पदविका ( व्यावसायिक , तांत्रिक etc )

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यसाठी पात्रता !

  • सदर योजनेसाठी , अर्जदार कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹2.5 लाख असणे आवश्यक आहे. अर्जदार 10 वी आणि 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने , कमीतकमी 2 वर्षांच्या कालावधीच्या पाठ्यक्रमात प्रवेश घेतला पाहिजे.
  • 10वी आणि 12वी मध्ये, सामान्य वर्गासाठी 60% आणि मागासवर्गीय आणि विकलांग विद्यार्थ्यांसाठी 40% किमान गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थ्यांकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि ते आधार कार्डशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारा , विद्यार्थी महाराष्ट्राचा स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे.
सुविधा खर्च
बोर्डिंग सुविधा रु 28000/-
लोजिंग सुविधा ( निवास ) रु 15000/-
मेडिकल & अभियांत्रिकी साठी रु 5000/- ( अतिरिक्त )
स्टेशनरी रु 8000/-
इतर खर्च 2000 (additional)
एकूण रु 51000 /-

स्वाधार योजनेस , आवश्यक कागदपत्रे !

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • बँक खाते
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

स्वाधार योजनेस अर्ज करण्यसाठी कृपया येथे क्लिक करा

स्वाधार योजनेस , अर्ज प्रक्रिया !

  • सर्व प्रथम वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईट ला भेट ला भेट द्यावी
  • होमपेज वर गेल्यावर ” स्वाधार योजना पीडीएफ ” वर क्लिक करून PDF डाउनलोड करून घ्यावी .
  • अर्ज फॉर्म डाउनलोड करा.
  • अर्ज फॉर्ममधील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • पूर्ण भरलेले अर्ज फॉर्म संबंधित समाज कल्याण कार्यालयात जमा करा.

स्वाधार योजना 2024 हा प्रकल्प केवळ महिलांच्या सशक्तीकरणावर लक्ष केंद्रित करत नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी देते आणि त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी तसेच त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक होण्यासाठी प्रोत्साहित करते. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे लाखो महिलांच्या जीवनात बदल घडविण्याची अपेक्षा आहे,

ज्यामुळे समाजात समानता आणि न्यायाची भावना वृद्धिंगत होईल. अशाप्रकारे, स्वाधार योजना 2024 एक नवीन आशा आणि संधीचे दार उघडते, जे सर्वांगीण विकासाकडे नेईल , त्याच प्रमाणे अश्याच एका शिष्यवृत्ती बद्दल जाणून घेण्यसाठी कृपया येथे क्लिक करा आणि अश्याच माहितीसाठी Rojgarsarthi.com ला भेट द्या .

rojgarsarthi.com

Recent Posts

LIC Sakhi Bima Yojana Apply Online : महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या अर्ज करा आणि महिन्याला कमवा 7000/-

LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…

5 days ago

लखपती दीदी योजना 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! आता व्हा लखपती अगदी घरबसल्या!

लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…

3 weeks ago

Cmegp योजना: मिळवा 35% कर्ज माफी – तुम्ही घेतला का लाभ? वाचा संपूर्ण माहिती!

महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…

3 weeks ago

Indian Agriculture News Today : सरकारकडून शेतकऱ्यांसाठी थेट मदतीची घोषणा – नवीन योजनेचा पहिला लाभार्थी तुम्हीच व्हा!”

Indian Agriculture News Indian Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

3 weeks ago

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 : 146+ रिक्त पदां साठी भरती प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 :  नवोदय विद्यालय समिती (NVS), प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी…

3 weeks ago

मुलगी UPSC उत्तीर्ण, आनंद गगनात मावेना, पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू! यवतमाळची दुख:द घटना.

नुकताच यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला यात महाराष्ट्रात 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी…

4 weeks ago