MJP Maharashtra Bharti 2025 – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात 290 नवीन पदांसाठी भरती सुरू!

MPJ Maharashtra Bharti 2025
MPJ Maharashtra Bharti 2025

MJP Maharashtra Bharti 2025

महाराष्ट्रातील पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसाठी कार्यरत असलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Maharashtra Jeevan Pradhikaran – MJP) यांनी नवीन भरती अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीत एकूण 290 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये होणार आहे.

या भरतीमुळे अभियांत्रिकी, तांत्रिक आणि प्रशासकीय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. चला तर मग या भरतीची सविस्तर माहिती पाहूया.

पदांची नावे आणि पदसंख्या ( Name Posts MJP Maharashtra Bharti 2025 )   

 MJP Maharashtra Bharti 2025 एकूण पदसंख्या : 290 पदे

  • आंतरिक लेखापरीक्षण अधिकारी / वरिष्ठ लेखा अधिकारी: ०२ पदे
  • लेखा अधिकारी: ०३ पदे
  • सहाय्यक लेखा अधिकारी: ०६ पदे
  • सहाय्यक लेखापाल: ०३ पदे
  • कनिष्ठ अभियंता (सिव्हिल): १४४ पदे
  • कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल): १६ पदे
  • उच्च श्रेणी लघुलेखक: ०३ पदे
  • कनिष्ठ श्रेणी लघुलेखक: ०६ पदे
  • कनिष्ठ लिपिक / लिपिक-टंकलेखक: ४६ पदे
  • सहाय्यक साठा रक्षक: १३ पदे
  • सिव्हिल अभियांत्रिकी सहाय्यक: ४८ पदे

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification MPJ Maharashtra Bharti 2025):

  • आंतरिक लेखापरीक्षण अधिकारी / वरिष्ठ लेखा अधिकारी:

वाणिज्य शाखेतील उच्च द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक. तसेच, पर्यवेक्षक पदावर किमान १० वर्षांचा अनुभव असावा.

  • लेखा अधिकारी:

मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी (M.Com) आणि व्यावसायिक विभागात लेखा कार्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.

  • सहाय्यक लेखा अधिकारी:

मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी (B.Com) आवश्यक.

  • सहाय्यक लेखापाल:

मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी (B.Com) आवश्यक.

  • कनिष्ठ अभियंता (सिव्हिल):

सिव्हिल अभियांत्रिकीतील डिप्लोमा किंवा पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक.

  • कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल):

किमान तीन वर्षांचा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, प्रॉडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी मध्ये असणे आवश्यक.

  • उच्च श्रेणी लघुलेखक:

१०वी उत्तीर्ण आणि शासनमान्य शॉर्टहँड प्रमाणपत्र असणे आवश्यक, ज्यामध्ये शॉर्टहँडचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट, तसेच इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट असावा.

  • कनिष्ठ श्रेणी लघुलेखक:

१०वी उत्तीर्ण आणि शासनमान्य शॉर्टहँड प्रमाणपत्र असणे आवश्यक, ज्यामध्ये शॉर्टहँडचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट, तसेच इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट असावा.

  • कनिष्ठ लिपिक / लिपिक-टंकलेखक:

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक. तसेच शासनमान्य व्यावसायिक टंकलेखन प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असावे. मराठीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजीमध्ये ४० शब्द प्रति मिनिट टंकलेखन वेग आवश्यक आहे.

  • सहाय्यक साठा रक्षक:

१०वी उत्तीर्ण आणि शासनमान्य टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण, मराठीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजीमध्ये ४० शब्द प्रति मिनिट वेग आवश्यक.

  • सिव्हिल अभियांत्रिकी सहाय्यक:

१०वी उत्तीर्ण आणि सिव्हिल अभियांत्रिकीतील पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक.

वयोमर्यादा ( Age Limit of MPJ Maharashtra Bharti 2025 )

  • सामान्य प्रवर्गासाठी: 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी: 18 ते 43 वर्षे

सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू होईल.

वेतनश्रेणी (Pay Scale MJP Maharashtra Bharti 2025):

  • आंतरिक लेखापरीक्षण अधिकारी / वरिष्ठ लेखा अधिकारी: प्रति महिना ₹56,100/- ते ₹1,77,500/-
  • लेखा अधिकारी: प्रति महिना ₹41,800/- ते ₹1,32,300/-
  • सहाय्यक लेखा अधिकारी: प्रति महिना ₹38,600/- ते ₹1,22,800/-
  • सहाय्यक लेखापाल: प्रति महिना ₹35,400/- ते ₹1,12,400/-
  • कनिष्ठ अभियंता (सिव्हिल): प्रति महिना ₹38,600/- ते ₹1,22,800/-
  • कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल): प्रति महिना ₹38,600/- ते ₹1,22,800/-
  • उच्च श्रेणी लघुलेखक: प्रति महिना ₹41,800/- ते ₹1,32,300/-
  • कनिष्ठ श्रेणी लघुलेखक: प्रति महिना ₹38,600/- ते ₹1,22,800/-
  • कनिष्ठ लिपिक / लिपिक-टंकलेखक: प्रति महिना ₹19,900/- ते ₹63,200/-
  • सहाय्यक साठा रक्षक: प्रति महिना ₹19,900/- ते ₹63,200/-
  • सिव्हिल अभियांत्रिकी सहाय्यक: प्रति महिना ₹25,500/- ते ₹81,100/-

 निवड प्रक्रिया( Selection Process MJP Maharashtra Bharti 2025)

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025 साठी खालीलप्रमाणे निवड प्रक्रिया होईल

1. लेखी परीक्षा – पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेण्यात येईल.

2. दस्तऐवज पडताळणी – परीक्षेत यशस्वी उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील.

3. अंतिम निवड यादी – पात्रता आणि गुणवत्तेनुसार अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

अर्ज प्रक्रिया ( How to Apply MJP Maharashtra Bharti 2025 )

ही भरती ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी खालील टप्पे पूर्ण करावे लागतील –

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि “भरती” किंवा “करिअर” विभागात जा.
  • नवीनतम सूचना शोधा: तुम्हाला ज्या विशिष्ट पदासाठी रस आहे त्यासाठी २०२५ च्या भरती जाहिराती पहा.
  • अर्ज लिंकवर क्लिक करा: अधिकृत सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर, संबंधित पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी एक लिंक असेल.
  • नोंदणी करा आणि लॉग इन करा: तुम्हाला तुमची मूलभूत माहिती देऊन पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर, अर्ज सुरू करण्यासाठी लॉग इन करा.
  • अर्ज भरा: सर्व आवश्यक वैयक्तिक, शैक्षणिक आणि इतर तपशील अचूकपणे भरा.
  • कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक कागदपत्रे, जसे की छायाचित्रे, स्वाक्षऱ्या आणि प्रमाणपत्रे, निर्दिष्ट स्वरूपात स्कॅन करा आणि अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा: जर अर्ज शुल्क असेल तर उपलब्ध पेमेंट पर्यायांद्वारे ते ऑनलाइन भरा.
  • पुनरावलोकन करा आणि सबमिट करा: अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुम्ही भरलेल्या सर्व माहितीचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा. अंतिम सबमिट करण्यापूर्वी तुम्ही बदल करू शकता.
  • एक प्रत जतन करा: सबमिट केल्यानंतर, भरलेल्या अर्जाची एक प्रत तुमच्या नोंदींसाठी जतन करा आणि प्रिंट करा.
अर्ज शुल्क (Application Fees MJP Maharashtra Bharti 2025):
  • मुक्त प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹1,000/-
  • मागासवर्गीय / अनुसूचित जाती / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी: ₹900/-
  • माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक उमेदवारांसाठी: शुल्क नाही (Nil)
महत्त्वाच्या तारखा ( Important Date MJP Maharashtra Bharti 2025 )
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 20 नोव्हेंबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2025
महत्त्वाच्या लिंक ( Important Date MJP Maharashtra Bharti 2025 )
FAQs – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र.1: MJP Maharashtra Bharti 2025 साठी एकूण किती पदे आहेत?

उ. या भरतीअंतर्गत एकूण 290 पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

प्र.2: अर्ज कसा करायचा?

उ. अर्ज ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करायचा आहे.

प्र.3: कोणत्या पात्रतेचे उमेदवार अर्ज करू शकतात?

उ. अभियांत्रिकी पदवी, डिप्लोमा तसेच लिपिकीय पदांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

प्र.4: शेवटची तारीख कोणती आहे?

उ. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2025 आहे.